सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना वाव देणारे माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन

सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना वाव देणारे
   माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन

लोकमत सखी मंचच्या  होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



    गडचिरोली :
   
     महिलांना कौटुंबिक जबाबदारी घरातील कामे,मुलांचे शिक्षण, संगोपन करीत असतांना त्या आपल्या कलागुणांना वाव देवु शकत नाही अनेक महिलांमध्ये आधीपासूनच कला- कौशल्य असूनही कामाच्या व्यापामुळे तसेच संधी व व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने त्या आपल्यातील कलागुण दाखवू शकत नाही. अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला पुढे येऊन आपल्या कलांना विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे खरोखरच अभिनंदनिय आहे.  महिलांनी आपल्या नियमित, दैनंदिन कामातून वेळ काढून आपल्या मधील सुप्त गुण बाहेर काढून विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा व आपल्यातील कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले. लोकमत सखी मंच गडचिरोलीच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
     लोकमत सखी मंच गडचिरोली च्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम नवेगाव कॉम्प्लेक्स येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार, लोकमत चे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ गणेश जैन, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, अनिता वैरागडवार, मंगला बारापात्रे, मृणाल मुरकुटे, रोहिणी मेश्राम  उपस्थित होत्या.

   होम मिनिस्टर कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये विजयी महिलांना माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉक्टर गणेश जैन तसेच सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . तसेच या सर्व स्पर्धामध्ये उत्कृष्ट कला सादर करून  यशस्वी झालेल्या एका महिलेची होम मिनिस्टर म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा भेटवस्तू, आकर्षक साडी व मुकुट देऊन मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लोकमत सखी मंच सदस्य व नवेगाव येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments