सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन अवार्ड करीता गडचिरोली जिल्ह्यतील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड!.
गडचिरोली,
दिनांक 2 नोव्हेंबर 2025 गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन करीता महाराष्ट्र राज्यातून गडचिरोली जिल्ह्यातून निवड करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो) च्या वतीने विविध सामाजिक कार्य व अनेक उपक्रम त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन व उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट दिल्ली यांनी घेतली. प्रामुख्याने त्यांच्या खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी. व एल, एल, डोंगरवार कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे गडचिरोली जिल्ह्यातील नक्सल प्रभावित व अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेवटच्या टोकावर आजपर्यंत 800 किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याचे डांबरीकरण रस्ते तयार करून सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले या बद्दल वर्दी वेलणेस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मानसी वाजपेयी यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड केली व सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन पुरस्कारासाठी निवड केली या बद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विस्वास. प्रदेश सल्लागार प्रकाश भाऊ गेडाम. प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी.विदर्भ सचिव रनेन मंडल. महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी. जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी. जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये कृष्ण वाघाडे,बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सैकत गाईन.विष्णू ढाली, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष बिजली मुजुमदार. तालुका अध्यक्ष विशाखा सिंग. तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड तालुका सचिव संतोष बुरांडे.दिनेश मुजुमदार, शुभमकर चक्रवर्ती. विलास वडेट्टीवार.किशोर कुंडू. भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉ. प्रनय भाऊ खुणे यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments