गडचिरोली शहरात निंबोरकर दांपत्याचा १५० कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश - नगर परिषद निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याचा भाजप चा प्रयत्न...
गडचिरोली शहरात निंबोरकर दांपत्याचा १५० कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश - नगर परिषद निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याचा भाजप चा प्रयत्न...
गडचिरोली ,
निंबोरकर दांपत्यानी १५० कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे नगर परिषद निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्याचा भाजप चा प्रयत्न. गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध कंत्राटदार अरुण भाऊ निंबोरकर यांचे चिरंजीव तरुण तडफदार युवानेते सागर अरुणभाऊ निंबोरकर तथा विदर्भ तैलिक महासभेचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसचे ओ. बी. सी. नेते सुरेश भांडेकर यांच्या कन्या प्रणोती सागर निंबारकर या दांपत्यासह १५० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे गडचिरोली शहरात भाजपाला बळ मिळाले आहे.
भाजपामध्ये नवचैतन्याचा संचार गडचिरोलीत भव्य पक्षप्रवेश सोहळा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर व माजी खासदार डॉ. अशोकजी नेते,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रमुख उपस्थित भाजपाचा पक्ष प्रवेश उत्साहात संपन्न
काँग्रेसला मोठा धक्का; सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांच्यासह शेकडो युवांचा भाजपात प्रवेश_
देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे कार्यकुशल आणि जनतेचा दृढ विश्वास संपादन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज गडचिरोली येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात शहरातील तरुण वर्ग, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश करून भाजप परिवारात नवऊर्जेचा संचार केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते उपस्थित होते.
या सोहळ्याला गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभैया कुकरेजा, शहराध्यक्ष अनिल कुंघाडकर, जेष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सागर अरुण निंबोरकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

0 Comments