नितीन तुमराम व स्नेहल गेडाम अव्वल

नितीन तुमराम व स्नेहल गेडाम अव्वल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त दौड स्पर्धा.३१५ युवक-युवतींना घेतला सहभाग


गडचिरोली : 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या वतीने अमिर्झा येथे युवक आणि युवती अशा दोन गटात दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल ३१५ युवक-युवतींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत रानखेडा येथील नितीन तुमराम व युवती गटातून भिकारमौशी येथील स्नेहल गेडाम हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मने यांनी दौड स्पर्धेला भगवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. ही दौड स्पर्धा अमिर्झा ते मुरमाडीपर्यंत घेण्यात आली. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मने यांनी मार्गदर्शन केले मुलींच्या दौड स्पर्धेत
द्वितीय क्रमांक आंबेशिवणी येथील साहिली चापले, तर तृतीय क्रमांक रानखेडा येथील राजश्री चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलांच्या दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक मौशीखांब येथील अमोल पदा याने तर तृतीय क्रमांक अमिर्झा येथील भूषण धारणे याने पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कवडू सहारे, उपतालुकाप्रमुख यादव लोहंबरे, विभागप्रमुख अमित बानबले, उपविभागप्रमुख संदीप आलबनकर, सरपंच सूरज उईके, नवनाथ उके, संजय बोबाटे, दीपक लाडे, नरेश कुकडकार, स्वप्निल खांडरे, अंबदास मुनघाटे, त्र्यंबक फुलझेले, प्रशांत ठाकूर, भाऊराव नन्नावरे, रत्नाकर रंधये, संदीप टेंभुर्णे, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, देवीदास चनेकार, मयूर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे,
उमाजी लाजुरकर, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, रुपेश आजबले, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, दिलीप वेलादी, नीकेश मडावी, अमर निंबोड, अमित हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सूरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवडू धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे, कैलास फुलझेले, वामन भरणे, रमेश आवारी, उमाकांत हर्षे, धनवान लडके, हरिदास हर्षे, धनंजय खेडेकर, हिरामण कोसमशिले, रवी हर्षे, सोनू सिडाम, नितू हर्षे, विजय भरणे, एकनाथ हर्षे, मोरेश्वर शेरकी, सूरज ठुसे, मोतीराम उंदिरवाडे, श्रेयस भानारकर, शिवसान बुरेवार, गजानन सिडाम, अधीन शेख, दिनेश नन्नावरे, बालाजी वाकडे, गोपाल हजारे, सिद्धार्थ सोरते, गोकुळ नागापूरे, बालाजी बाबनवाडे, ताराचंद चुधरी, चेतन नागरे, खुशाल ढोलणे, सौरव कुरुडकार, राजू जवादे, विनायक कुरुडकार, अजय ठाकरे, मोहन करकाडे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments