गडचिरोली जिल्ह्यातील नियमबहाय निविदा प्रक्रिया राबवून एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने देण्यात आलेले ते पाचही कामे तात्काळ रद्द करण्यात यावे
पाचही कंत्राट बांधकाम विभागाने तात्काळ रद्द करावे अन्यथा गडचिरोलीत विराट जनआंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा!
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक ते पाच कामाच्या निविदा प्रकाशित झाल्यानंतर पाचही कामे बाबत कंत्राटदाराकडून स्पर्धा झाली व प्रत्येक निविदेत नऊ ते दहा कंत्राटदार यांनी निविदा भरलेल्या होत्या यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथे निवेदन सादर केलेल्या कागदपत्रे बंद करून आपल्या कार्यालयात जमा करावयाचे होते,सदर कागदपत्रे जमा करावयास आपल्या कार्यालयामध्ये कंत्राटदार आले असता आपल्या कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कंत्राटदारानी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली.
या निविदा प्रक्रियेत घोळ होत असलेली शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली दंडकरण्य कंत्राटदार
संघटना गडचिरोलीच्या वतीने 28/8/2025 ला पत्रकार परिषद घेऊन सदर निविद्या प्रक्रियेत आक्षेप नोंदविला व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांना देण्यात आले बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने कागदपत्र तपासणी केले असता या कंत्राट मध्ये सहभागी झालेले कंत्राटदार कंपनी संपूर्ण भारतात हजार ते 500 कोटी रुपयांचे कामे घेण्यासाठी पात्र होतात मात्र एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतूपरस्पर फायदा करून देण्यासाठी 100 ते 150 कोटींचा कामात हेतूपरस्पर अपात्र ठरवण्यात
आले, व एका विशिष्ट कंपनीला पात्र करून निविदा उघडण्यात आले
सदर निविदा उघडल्यानंतर त्या एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने कामे देण्यात आले, ज्या अर्थी मागील पाच वर्षात जिल्ह्यात मोठया प्रमाणात नक्सलवाद असतांना 30 टक्के पेक्षा
कमी दराने कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत, त्याचा संपूर्ण लेखा जो्खा बांधकाम विभागात आहे,
आज नक्सलवाद संपला असला असतांना व कंत्राटमध्ये स्पर्धा होत असतांना गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित पाचही कामात आर्थिक व्यवहार करून 10 टक्के जास्त दराने हेतूपरस्पर एकाच कंपनीला पाचही कामे देण्यात आले, सदर पाचही कामे तात्काळ रद्द करण्यात यावे व या पाचही कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन करावे बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने एकाच कंपनीला 500 कोटीची कामे दहा टक्के अधिक दराने दिल्यामुळे दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा बसणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बोगस पद्धतीने पाचही झालेल्या कामाच्या निविदा तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा गडचिरोलीत विराट जन आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे तसेच सदर कांत्राट रद्द करण्यात यावा अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, मिलिंद भाऊ नरोटे आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांना दक्षिण गडचिरोली दंडकारन्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष साई बोम्मावार व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांनी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली,
यावेळी कंत्राटदार संघटना नेते नितीन भाऊ वायलालवार, व्ही, बी, बोम्मावार, एल, एल, डोंगरवार, किरण राजापुरे, महेश मोहुरले, व्यंकटस्वामी पोचमपल्ली,धंनजय पडिशालावार व पदाधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनीषा ताई मडावी,जिल्हा उपाध्यक्ष,प्रकाश थुल
नानु भाऊ उपाध्ये, कृष्णा वाघाडे,दिनेश मुजुमदार, लीना विस्वास, लक्ष्मी ताई कन्नाके, व पदाधिकारी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments