राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय येथे 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रम संपन्न:-
भामरागड -
राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालय येथे 'वाचन प्रेरणा दिन'साजरा करण्यात आला.कार्यक्रमांची सुरुवात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, सरस्वती माता व राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संजय खंडारकर तर प्रमुख पाहुणे तहसील कार्यालय भामरागड चे महसूल सहा.वैभव सानप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.विनायक मोराळे यांनी डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे वैभव सानप यांनी वाचनाचे फायदे,वाचनाची सवय ही सर्वात चांगली सवय आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी सतत वाचन आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात संजय खंडारकर यांनी वाचनाने माणूस कसा घडतो याची उदाहरणे देऊन विद्यार्थी ची मने जिंकली जिवनात जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता आवश्यक आहे असे प्रतिपादन केले अब्दुल कलाम साहेबांकडे जिद्द होती म्हणूनच त्यांनी अग्नी, पृथ्वी यासारख्या क्षेपणास्त्राच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऊमिला पुंगाटी प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. सपना वड्डे तर आभारप्रदर्शन कु. सपना कुरसामी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी व बंडु बोंडे, सुनिल ताजणे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0 Comments