गडचिरोली,
गडचिरोली नगर परिषदेसाठी वर्ष २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट जनतेकडून निवडून आलेल्या भाजपच्या योगिता पिपरे यांनी नगराध्यक्षा म्हणून आपला पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करत गडचिरोलीच्या विकासाचा नवा अध्याय रचला.
त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शहराच्या सौंदर्यीकरणासारखी अनेक महत्त्वाची विकासकामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली. शहरातील नागरिकांमध्ये आजही त्यांच्या कार्यपद्धतीची, प्रामाणिकतेची आणि समर्पणभावाची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहराचे रूप पालटले असून त्या महिलांच्या नेतृत्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
नगराध्यक्षा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर योगिता पिपरे यांनी एक वर्ष गडचिरोली जिल्हा महिला प्रभारी म्हणून काम केले, तर त्यानंतर सलग दोन वर्षे जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि महिलांच्या राजकीय सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकुशलतेवर आणि नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून भाजपच्या उच्च नेतृत्वाने त्यांच्यावर महिला जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत पक्षाने नगराध्यक्षा पदासाठी योगिता पिपरे यांना दावेदारी द्यावी, अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
योगिता पिपरे यांच्या यशस्वी प्रवासामागे त्यांचे पती प्रमोद पिपरे यांचेही मोलाचे योगदान आहे. ते २००१ पासून आजपर्यंत चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी भाजपच्या समन्वयकाची जबाबदारी निभावली असून, संघटनशक्ती वाढविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि राजकीय कौशल्यामुळे त्यांची ओळख ‘राजकारणातील चाणक्य’ अशी निर्माण झाली आहे.
सध्या नगर परिषदेत प्रशासक राज असला तरी पिपरे दांपत्य समाजकार्य, महिला सबलीकरण, युवा विकास आणि जनसेवा या क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली असून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न सतत सुरू आहे.
गडचिरोलीच्या नागरिकांच्या मनात योगिता पिपरे यांनी एक प्रामाणिक, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख जनसेविका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांमुळे गडचिरोली शहराच्या प्रगतीचा पाया अधिक भक्कम झाला आहे.
नवीन उमेदवारांना संधी न देता, पक्षाने जुन्या एकनिष्ठ आणि राजकारणात सक्षम कार्यकर्त्यांचा विचार करून संधी द्यावी, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये सुरू आहे.

0 Comments