गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार साहेब चामोर्शी तालुक्याचा विकास सापडला खड्डयात
चामोर्शी,
चामोर्शी तालुक्यातील शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक रस्त्यावर आज एकच प्रश्न उपस्थित होत आहे. 'रस्ता कुठे आणि खड्डा कुठे?'आमदार डॉ नरोटे साहेब चामोर्शी तालुक्यातील प्रमुख मार्ग, अंतर्गत गावरस्ते आणि हायवे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
त्यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासन मात्र' लवकरच काम सुरू होईल' अशीच जुनी टेप वाजवत आहे.पण दर दोन तीन दिवसाला दुचाकी ने होणारे अपघात व सामान्य माणसाच्या जीव गमवावा लागला आहे तरी
सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्षात
रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. केवळ आश्वासनांवर तालुका चालत नाही, हे आता नागरिकांना चांगलेच पटले आहे. पावसाळा जवळपास संपूनही रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून अक्षरशः 'खड्ड्यातून मार्ग काढत' प्रवास करावा लागत आहे.
'तालुका विकासाकडे दुर्लक्ष होत असताना, लोकप्रतिनिधींनी आता तरी वास्तवाचा विचार करावा,' अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. पुढे ते म्हणतात, 'रस्ते दुरुस्त न झाल्यास, येणाऱ्या काळात युवा पिढी व नागरिक योग्य तो निर्णय घेतील.'
तालुक्यातील प्रत्येक गावात 'हायवे की खड्डेवे?' अशी चेष्टा सुरू असून, या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, नागरिकांचा संयम सुटण्यास वेळ लागणार नाही! म्हणजे आंदोलनांचा पवित्रा एकंदरीत नागरिकांनी केलेले घ्यावा लागेल. तालुक्यातील उपस्थित प्रश्न? 'रस्त्यांवरून जाणं म्हणजे दररोजचा अॅडव्हेंचर ट्रिप !गडचिरोली विधानसभा चे 'आमदार साहेब
'जनतेचा प्रश्न विकास फक्त भाषणात की प्रत्यक्षात ?'
'खड्डे वाढले, संयम संपला, जबाबदारी कोणाची अशी विचारणा केली जात आहे.

0 Comments