खाकी'ने बजावले कर्तव्य, दुर्गोत्सव शांततेत
गडचिरोली :
शहरात नवरात्रोत्सवाच्या
निमित्ताने नऊ दिवस देवी उपासनेचा जल्लोष रंगला होता. या उत्सवाची सांगता देवी विसर्जनाने झाली. सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील विविध मंडळांकडून दुर्गा आणि शारदा मातेच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष आणि पारंपरिक नृत्याच्या तालावर निघाल्या. विसर्जनाच्यावेळी हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती. मात्र, पोलिस बंदोबस्तामुळे विसर्जन शांततेत
पार पडले. मिरवणुकांमध्ये युवक-युवतींचा
उत्साह पाहण्यासारखा होता. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या तरुणांनी ढोल, ताशा आणि झांज वादन करून वातावरण भारावून टाकले, महिलांनी लेझीम, गरबा आणि पारंपरिक नृत्य सादर करून देवीभक्तीचा आविष्कार केला. लहान मुलांनी देतीच्या रूपांतील वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गडचिरोली येथील विसर्जनस्थळी तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी.
मिरवणुकांमध्ये हजारोंची गर्दी
मिरवणुकांदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गडचिरोली पोलिस विशेष सतर्क होते.
गडचिरोली शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणुका निघतात. मिरवणुकीच्या कालावधीत वाहतूक ठप्प पडणार नाही, याचीही दक्षता पोलिसांनी घेतली होती. विसर्जनस्थळीही अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. हजारोंची गर्दी उसळली असतानाही कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
स्वच्छता मोहीम
शहरातील काही स्वयंसेवी
संस्थांनी दसऱ्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. प्रत्यक्ष मंडळाच्या परिसरात जाऊन कचरा उचलण्यात आला. स्वच्छतेचे काम मंडळाच्या सदस्यांनी राबविले.
0 Comments