शिवसेनेच्या (उबाठा) युवा जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांच्या कडून शेतकऱ्यांची फसवणूक - गौवंश तस्करीत वा तस्करांना गौवंश विकण्याचा आरोप

शिवसेनेच्या (उबाठा) युवा जिल्हाध्यक्ष पवन गेडाम  यांच्या कडून
  शेतकऱ्यांची फसवणूक - गौवंश तस्करीत वा तस्करांना गौवंश विकण्याचा आरोप
गडचिरोली : शिवसेनेचा
(उबाठा) युवा जिल्हाध्यक्ष पवन गेडाम याने सन २०१८ मध्ये आमच्याकडून बैल खरेदी करून त्याचा मोबदला न देता १ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती शिवनी येथील बैलमालक शेतकरी योगाजी गेडाम, सुरेश शेंडे, बाजीराव चौधरी, नीलेश चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत दिली
डिसेंबर २०१८ मध्ये आम्ही तीन शेतकऱ्यांनी पवन गेडाम याला बैल विकले होते. तीन दिवसानंतर पवन गेडाम याने पैसे आणून देतो, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. मात्र, त्यानंतर तो आलाच नाही. तेव्हापासून त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. आम्ही १ लाख
३५ हजार रुपये किमतीचे बैल पवन गेडाम याला विकले. मात्र, त्याने आम्हाला बैल विकल्याचे पैसे दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आमचे पैसे मिळवून देण्याची मागणी पशुपालक शेतकरी योगाजी मेश्राम, सुरेश शेंडे, बाजीराव चौधरी यांनी केली आहे.

पवन गेडाम अगोदर भाजपात सक्रिय होता,मी स्वतः त्याला शिवसेनेत आल्या आल्या युवा सेना चा प्रमुख पद द्यायला पक्ष वारिस्ठा कडे विरोध केला होता,पण त्याची दखल न घेता त्याला जिल्हाप्रमुख बनवण्याचे काही वरिष्ठ नेते त्त्याचा नाव चालवित होते,जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी यांची तक्रार करत याला जिल्हाप्रमुख होण्याचे डोहाळे लागले होते त्या करिता त्याचे मुंबई वारे सुरू झाले होते.गौवंश तस्करीत किवा तस्करांना गौवंश विकण्यात पवन गेडाम चा सहभाग असेल तर त्वरिष्ठांना कळवून त्याला पदा वरून आणि पक्षातुन बडतर्फ करण्याच करेल,या अगोदर पण शिवनी प्रकरणात याची वरिष्ठा कडे तक्रार केली होती.
 विजय  श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली


Post a Comment

0 Comments