एटापल्ली पंचायत समिती चा कारभार राम भरोसे
बीडीओ, एबीडीओ सह सर्व कर्मचारी 4 वाजता गायब
तालुका प्रतिनिधी एटापल्ली,
येथील पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी 4 वाजताच गायब झाले असून दुर्गम नागरिकांना आल्यापावली परत जाण्याची वेळ आल्याने संतप्त नागरिकांनी आपली शासकीय कामासाठी कार्यालयात वारंवार जात असताना अधिकारी आपल्या मुख्यल्यात भेटत नाही समोर दिवाळीचा सण आहे आणि शेतकरी लोकांचे कामे बाकी आहे या वेळी अधिकारी उपस्थित राहणार नाही तर सामान्य नागरिकांना खुप अळचणी चा सामना करावा लागतो ,आमच्या प्रतिनिधीला बोलवून आपली वेथा मांडली सदर कार्यालयात जाऊन पाहणी केली असता शिक्षण विभागातील अधिकारी कोडापे, लिपिक गोरद्वार शिपाई निर्मला उसेंडी यांना वगळता गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी सह लेखा विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग व इतर कक्षात एकही अधिकारी कर्मचारी आढळून आले नाही संपूर्ण कक्षातील लाइट पंखे व इतर विद्युत उपकरणे चालू होते व त्याचा आनंद रिकाम्या खुर्च्यांना होत होता हे विशेष या प्रकरणा ची माहिती करिता स्वतः गैर हजर असलेले गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांना दूरध्वनी करून संपर्क केला असता गैर हजर असलेल्या कर्मचाऱ्यावर जिल्हा सेवा अधिनियम नुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले गट विकास अधिकारी हे स्वतः गैर हजर आहेत तर मग त्याच्या वर कार्यवाही करणार कोण असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तेजस गुंजलवार यांनी केली आहे
गैरहजर गटविकास अधिकारी सह संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचेवर बिन पगारी रजा लाऊन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कारवाही करण्यात येईल
सुहास गाडे (भा.प्रे.से.)
मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली
0 Comments