शेकापचे शिलेदार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लढणार -
जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव पारित.
गडचिरोली :
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात पक्षाने डाव्या आघाडीतील मित्रपक्षांसह भांडवलदार समर्थक भाजप - काॅंग्रेसच्या विरोधात मुख्य लढतीत सामान्य जनतेचा आवाज बुलंद करत सर्व जागांवर उमेदवार उभे करावेत, असा महत्त्वपूर्ण ठराव पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते पारीत करण्यात आला.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाई रामदास जराते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व होवू घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्राथमिक दिशा ठरविण्यात आली.
जेप्रा - विहिरगाव, मुडझा - येवली, कोटगल - मुरखळा, वसा - पोर्ला, विक्रमपूर - फराडा, भेंडाळा - मुरखळा, कोठारी - शांतिग्राम, पंदेवाही - बुर्गी, आरेवाडा - लाहेरी, चातगाव - कारवाफा, पेंढरी - गट्टा या क्षेत्रात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात तसेच गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने प्राधान्याने उमेदवार उभे करावेत व इतर जागांवर डाव्या मित्रपक्षांना सहकार्य करत प्रस्थापित पक्षाविरोधात दंड थोपटावे असेही ठरावात एकमताने निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य व जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, डॉ. गुरुदास सेमस्कर, रमेश चौखुंडे, डंबाजी भोयर, कविता ठाकरे, दामोदर रोहणकर, चंद्रकांत भोयर, देवराव शेंडे, देवेंद्र भोयर, योगेश चापले प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments