परतीच्या पावसाने धानपीक जमीनदोस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

परतीच्या पावसाने धानपीक जमीनदोस्त 
कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - 
नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी 
तालुका प्रतिनिधी कोरची ,
          गत 4 दिवसांपासून सुरू असलेल्या परतुच्या पावसाने कोरची तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.वादळी वाऱ्यासह येत असलेल्या पावसाने निसवलेले उभे पीक आडवे झाले ‌आहे.यामुळे शेतखऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
     गततीन 3ते 4 दिवसांपासून तालुक्यात संततधार मुसळधार पाऊस सुरू आहे.या पावसामुळे कोरची तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रचंड बसला आहे ‌सध्या निसवणीला आलेले हलक्या मध्यम प्रजातीचे धानपीक आडवे पडले आहेत.त्यामुळे धान सडण्याची चिंता शेतकऱ्यांकून व्यक्त केली जात आहे.कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाह कसा करायचा अशी चिंता सतावत आहे.चिंतामन शेंडे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रीया -
चिंतामण शेंडे याच्या शेतावर भेट दिली.गत काही दिवसांपासून मोठ्या कष्टाने शेती पिकवली.परतु मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते झाले.त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आथिॅक मदत द्यावी.अशी मागणी नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची.

Post a Comment

0 Comments