भामरगड राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, मुलांच्या कबड्डी संघाचे सहभागी

भामरगड  राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, मुलांच्या कबड्डी संघाचे सहभागी
भामरगड,
पहिल्यांदाच राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरगड येथील मुलांच्या कबड्डी संघाने गोंडवाना विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा २०२५-२६ मध्ये सहभाग नोंदविला. ही स्पर्धा १७ ते १८ सप्टेंबर रोजी ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे पार पडली.

संघाने उत्साही खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकली. जरी आमचा संघ गुरुकुल कला वाणिज्य महाविद्यालय, नांदा यांच्याकडून २०-१२ अशा फरकाने पराभूत झाला तरी त्यांच्या जिद्दी व लढाऊ खेळाचे सर्वांनी कौतुक केले. या ऐतिहासिक सहभागाने आमच्या महाविद्यालयाच्या कबड्डी प्रवासाची अभिमानास्पद सुरुवात झाली आहे.

आमचे माननीय प्राचार्य डॉ. एच. जी. लाड, शारीरिक शिक्षण संचालक मा. विशाल एस. तावेडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांच्या सततच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Post a Comment

0 Comments