नगर परिषद पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर ला जिल्हाधिकारी यांची भेट.

नगर परिषद पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर ला जिल्हाधिकारी यांची भेट. 
गडचिरोली,
शालेय भौतिक सुविधा व शाळा सुरक्षा योजना अंतर्गत जिल्हाधिकारी मा. अविश्यांत पांडा यांनी उपक्रमशील पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर येथे भेट दिली. या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांचे कडून घेतली. या भेटीत जिल्हाधिकारी यांनी शाळेतील विविध सुविधा, सुरक्षा उपाय यांची पाहणी केली. शाळेतील विविध प्रयोगशाळेची सुध्दा पाहणी केली. यादरम्यान वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेतील उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली. पालकांच्या देणगीतून शाळेत झालेले नाविन्यपूर्ण काम यांची पाहणी करून झालेल्या बदलांचे कौतुक केले. इतर शाळांनी सुध्दा शाळेत लोकसहभाग मिळवूण शाळा दर्जेदार करावे असे सूचित केले. सोबत पालकांनी शाळेत सध्या नर्सरी ते आठवी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे ती वाढवून शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी केली त्याकरिता वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता निधीची मागणी केली. जिल्हाधिकारी महोदय  यांनी तात्काळ आठ दिवसांत निधी देण्यात येईल याकरिता उपस्थित मुख्य अधिकारी मा. सुर्यकांत पिदुरकर यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान उपस्थित मा. बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मा. वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद गडचिरोली यांना शाळेला तात्काळ इयत्ता नववी व दहावी वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत सूचना दिल्या. याप्रसंगी शाळेतील उपक्रमाने मा. जिल्हाधिकारी मोहित झाले व जिल्ह्यात स्मार्ट स्कुल (आदर्श शाळा) तयार करण्यासाठी मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांची मदत घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. याप्रसंगी मा. सुर्यकांत पिदुरकर, मुख्य अधिकारी यांना प्रस्ताव सादर करताच वर्ग खोली बांधकाम निधी देण्यात येईल तात्काळ पुढील मे पर्यंत वर्गखोल्या बांधून नववीचा वर्ग सुरू करण्यास सांगितले. मा. जिल्हाधिकारी यांनी शाळा परिसर फिरुन अतिशय सुंदर शाळा, इतर शाळेनी या शाळेची पाहणी करून आपल्या शाळा या शाळेसारख्या करावे जेणेकरून सर्व शाळांचा परिसर स्वच्छ, सुंदर राहिल व अशा सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. याप्रसंगी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग यांचे द्वारे शाळेची निवड शैक्षणिक पर्यटन शाळा  या उपक्रमात झाल्याने जिल्हाधिकारी यांनी शाळेचे अभिनंदन केले. हि शाळा जिल्ह्यातील इतर शाळांसाठी दिपस्तंभ आहे असे उदगार काढले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी या. विवेक नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी या. सहाळा सर, नगर परिषद गडचिरोली चे अभियंता अंकुश भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेचे शिक्षक, सर्व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments