गडचिरोली जिल्हातील विकासकामांना गती देण्यात यावी
माजी खा. अशोक नेते यांची ना. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यातील महामार्ग व अन्य कामांना गती देण्यात यावी अशी मागणी माजी खा. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथे चर्चेदरम्यान केली.
देवरी-आमगांव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे तसेच गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग आणि आरमोरी-गडचिरोली महामार्ग यासंबंधीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे आज प्रत्यक्ष भेट घेतली.
या चर्चेत व निवेदनाद्वारे
क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनमानाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडण्यात आले. रावणवाडी (महाराष्ट्र) काम ाठा-आमगांव-सालेकसा-दर्रेकस -पनियाजोब-डोंगरगाव-तुमडी बोर्ड (छत्तीसगड) या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
द्यावा. देवरी-आमगांव राष्ट्रीय महामार्गावरील बामणी व किडगीपार येथील रेल्वे क्रॉसिंगवर मंजूर उड्डाणपूलाचे तातडीने सुरू काम करावे. धानोरा-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने सुरु असलेले काम
गतीमान
करावे. गडचिरोली-आरमोरी फोर-लाईन मंजूर झाल्याबद्दल अभिनंदन करून या कामांना गती द्यावी अशी मागणी करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहानुभूतीपूर्वक चर्चा करत आवश्यक निर्णय घेऊन कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी आ. भैरसिंग नागपूरे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जेष्ठ नेते झामसिंग येरणे, भाजप नेते
घनश्याम अग्रवाल, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, जिल्हा सचिव देवेंद्र मच्छीरके, राजेश शिवणकर, कैलास तिवारी, धनलाल मेंढे, संतोष श्रीखंडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली
जिल्ह्यातील विकासकामांना गतीमान करणे हेच आपले ध्येय आहे. राज्य व केंद्र सरकारच्या साहाय्याने रस्ते, पूल व प्रशासकीय प्रश्न सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे
0 Comments