भारतीय जनता पार्टी-महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने कॉंग्रेस पक्षाचा जाहीर निषेध.
बिहार राज्याच्या निवडणुकीच्या मुद्यावरून समाजात विष पेरून मातृशक्तिचा अपमान करणार्या कॉंग्रेस पक्षाचा जाहीर निषेध- योगीता पिपरे
गडचिरोली,
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी
भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भाजपा महिला आघाडीच्या
जिल्हाअध्यक्ष माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात इंदिरागांधी चौकात कॉंग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची विचारधारा ही कायम समाजात विष पेरणारी व नारीशक्तीचा अपमान करणारी राहिली आहे.
पंतप्रधान पद हे देशाचे असतात आणि त्यांचा आई विषयी बोलताना अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटने हा देशातील समस्त मातृशक्तिचा अपमान आहे आणि देशातील मातृशक्ति ही कॉंग्रेसचे विष कधीही सहन करणार नाही.
बिहार निवडणुकीचा मुद्दा पुढे करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान व अनादर करणार्या कॉंग्रेस पक्षाचा भाजप महिला आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहे.
या निषेधआंदोलनात सहभागी भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव सौ.रेखाताई डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री सौ. गीताई हिंगे, राज्य परिषद सदस्य सौ.डॉ. चंदा कोडवते, भाजप जिल्हा सचिव सौ. वर्षा शेडमाके, महिला आघाडी जिल्हा महामंत्री सौ. अर्चनाताई बोरकुटे, श्रीमती. प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका सौं. वैष्णवी ताई नैताम,सौ. लताताई लाटकर, नीताताई उंदीरवाडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव. अर्चनाताई चन्नावार, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सीमाताई कन्नमवार, महिला आघाडी च्या भूमिका बर्डे, गीताताई कुढमेथे, अर्चनाताई निंभोळ, रश्मीताई बाणमारे, वर्षा कन्नाके, सुरेखा कंचर्लावार, भूषणा खेडेकर, भारती खोब्रागडे.
0 Comments