कोरची येथील नालीचे बांधकाम करा. वार्ड क्रमांक 5 च्या लोकांची मागणी.
कोरची.
येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या धो- धो पावसाने चांगलेच धुतले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नाल्या फुटल्या आहेत. अशी परिस्थिती फक्त वार्ड क्रमांक 5 मध्येच नाही आहे तर संपूर्ण गावात आहे. गावातील प्रत्येक वार्डातील लोकांनी या व अशाप्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मागील आठवड्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
वार्ड क्रमांक 5 मधुन नगरपंचायत चे विरोधी पक्षनेते नसरू भामाणी हे निवडून आले आहेत. ते जरी विरोधी पक्षात असले तरी, सत्तेत असलेल्या पक्षात सुद्धा त्यांची चांगली चलती आहे. त्यामुळे त्यांच्या वार्डात जाणून बुजून सत्ताधारी लोक काम देत नाही किंवा करीत नाही असे नाही आहे.
प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे आणि केलेल्या कार्यवाही ची माहिती वार्डातील लोकांना द्यावी. अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
0 Comments