ओबीसीच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथे साखळी उपोषण
गडचिरोली,
ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक धोरणं तयार करणे, त्यांच्या आरक्षणाच्या अधिकारांवर कुठलाही आघात होऊ नये. याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघ व विविध ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नागपूर येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या साखळी उपोषणात सहभागी झालो.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सर, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब, शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबले सर , गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे सह ओबीसी नेते कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments