लॉईड्स मेटल्स ने उपलब्ध करून दिले अपघातातील जखमींसाठी हेलिकॉप्टर

लॉईड्स मेटल्स ने उपलब्ध करून दिले अपघातातील जखमींसाठी हेलिकॉप्टर गडचिरोली, गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी आरमोरी-गडचिरोली महामार्गावर अज्ञात चारचाकीने झालेल्या एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि वेदनादायी घटना घडली असून या घटनेत 2 युवक जखमी झाले आहेत. जखमींवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते आणि त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे कळताच, लॉईड्स मेटल्स तर्फे तत्काळ स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले असून जखमींना नागपूरला पुढील उपचारासाठी नेण्यात येत आहे. लॉईड्स मेटल्स ने ह्यापूर्वीसुद्धा सामाजिक जाणिवेचा परिचय देत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. नुकतेच 2 ऑगस्ट रोजी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन ह्यांनी स्वतः हेलिकॉप्टरने हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस नाईक श्री. राहुल गायकवाड ह्यांना हेडरी हून नागपूरला उपचारासाठी पोहचविले होते.

Post a Comment

0 Comments