मानवता जपणारा एक सकारात्मक पुढाकार -मा.संतोष गदेशीरवार


मानवता जपणारा एक सकारात्मक पुढाकार -मा.संतोष गदेशीरवर


एटापल्ली, तालुका प्रतिनिधि शशांक नामेवार

अहेरी ते बोलेपल्ली शाळकरी विद्यार्थ्यांसाठी असलेली बस सेवा पावसामुळे बंद होती. अहेरी येथील लक्ष्मण नाला भरल्यामुळे अहेरी आगार तर्फे बस एटापल्ली मार्गे न टाकता थांबविण्यात आली. दररोजप्रमाणे शाळा सुटल्यावर सायं. 5.00 वाजता अनेक विद्यार्थी एटापल्ली बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे होते. मात्र सायं. 7.15 पर्यंतही बस न आल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता, समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे मा. संतोष भाऊ गंदेशिरवार यांनी स्वखर्चाने वाहन उपलब्ध करून विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवले. या सामाजिक कार्यात समर्पण संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, आतिष खापणे, सुमित नाडमवार, संजय जानकी, महेंद्र सुल्वावार, साई पितुलवार, राहुल करणेवार, सागर भोयर यांची उपस्थिती होती. *समर्पण सामाजिक संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे.

Post a Comment

0 Comments