गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे 1 ऑगस्ट रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे 1 ऑगस्ट रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन

वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा, शासकीय भरती आणि इमारतीच्या मागणीसाठी आंदोलन


गडचिरोली ,
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिरोली येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत आजपर्यंत अस्तित्वात आलेली नाही.  
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना व त्यांच्या सोबतीला सह पालकमंत्री आशिष जी जयस्वाल असे दोन पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात असताना सुद्धा  वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारती करता जागा उपलब्ध होत नसेल 
तर यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  ही परिस्थिती सरकारच्या निष्क्रीयतेचे प्रतीक आहे.

याशिवाय, सदर वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असली, तरी आजतागायत ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत पार पाडण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी, दुपारी 1 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. भिकेच्या माध्यमातून गोळा झालेला निधी शासनाला देऊन त्या माध्यमातून तरी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारत करीता जागा खरेदी करावी   अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे. 
 या आंदोलनात जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments