गडचिरोली शहरात काळी पिवळी वाहने प्रवाशांच्या जीवाला धोकादायक

मासिक 300 रुपये हफ्ता घेऊन आर टी ओ आणि वाहतूक विभागाने परिवहन कायदाच गहाण ठेवल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले.



गडचिरोली: गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चारही महामार्गांवर चालणारी काळी पिवळी चारचाकी वाहने परमिट पेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतुक नियमाचे तीन तेरा वाजवताना दिसून येत असल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे.
गडचिरोली शहरातून चामोर्शी, धानोरा, आरमोरी, वडसा तालुक्यात जाण्यासाठी वेळेवर एस टी बस मिळत नसल्याने प्रवासी लोकांना मजबुरीने काळी पिवळी चारचाकी वाहनांचा आधार घ्यावा लागतो परंतु प्रवाश्यांना आपला जीव धोक्यात असल्याची चाहूल लागत असली तरी त्याचा कायद्याच्या भाषेत कोणताच सुरक्षित उपाय सरकारी यंत्रणेतून मिळेल याची शक्यता नाही.

अवैध प्रवासी वाहतुकीची सविस्तर माहिती घेतली असता अनेक काळी पिवळी चारचाकी वाहने ही वीस वर्ष जुनी असतांना सुद्धा या वाहन धारकांकडून मासिक 300 रुपये हफ्ता घेऊन आर टी ओ आणि वाहतूक विभागाने परिवहन कायदाच गहाण ठेवल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले.

काळी पिवळी चारचाकी वाहनांना पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षांकरिता ग्रीन पासिंग करावी लागते,त्यानंतर वीस वर्षे संपल्यानंतर सदर वाहनान भंगारात काढावी लागतात परंतु ग्रीन पासिंग न केलेली आणि वीस वर्षे मुद्दत संपल्यानंतर सुद्धा ही वाहने प्रवाशांच्या जीवाला धोक्यात घालून राजरोसपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याने आता आर टी ओ आणि वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर लोकांकडून शंका निर्माण केली जात आहे.

एखाद्या वेळेस प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास ही वाहने आपल्या एकीच्या भरोष्यावर सरकारी कर्मचाऱ्यावर दडपण आणत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
या बेकायदेशीर अवैध प्रवासी वाहतुकीवर परिवहन कायद्याने आळा घातल्या जाईल की हफ्तखोरीच्या भरोष्यावर जसेच्या तसेच नेहमी प्रमाणे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात ठेवल्या जाईल याची खात्री करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे.

सवारी ऑटो चालकांची दादागिरी... कॉम्प्लेक्स 30 रुपये सवारी आणि सामान्य रुग्णालयाचे स्पेशल भाडे 200 रुपये...

भर चौकात वाहतुकीला अडचण निर्माण करून युनिफॉर्म न घालता राजरोसपणे प्रवासी लोकांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सवारी आटोचालकांवर वाहतूक विभागाची मेहरबानी... ऑटो चालकांची संघटना पडली परिवहन कायद्यावर भारी...

इलेक्ट्रिक ऑटो चालकांना धमकावणारे इतर सवारी ऑटो चालकांवर कधी करणार कारवाई...?

डीजल पेट्रोल वर चालणारे वाहनांमुळे होणारा प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने इलेक्ट्री वाहन धोरण देशभरात राबविण्यात येत आहे पण गडचिरोली शहरात डीजल पेट्रोल वर चालणारे ऑटो चालक हे इलेक्ट्रिक ऑटो चालकांना धमकावून, राजरोसपणे परिवहन कायद्याचे उल्लंघन करून,युनिफॉर्म न घालता, परमिट पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर परिवहन कायद्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आता परिवहन आणि वाहतूक कायद्यावर आटोचालकाची नेतागिरी वाढत असल्याची खात्रीशीर माहिती परिवहन कायद्याचे पालन करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

Post a Comment

0 Comments