सर्व समाज बांधवांच्या विकासासाठी झटणारे भाजपा आमदार डॉ.देवरावजी होळी
भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे
नवेगाव येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा
गडचिरोली:-
गेल्या 70 वर्षात भारत देशाचा आणि महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली विकास झालेला नव्हता आज 10 वर्षामध्ये देशाते पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने देशासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास होत आहे.यामध्ये गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम,मागासलेला, नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा जिल्हा म्हणून ओळखला जात होता.पण जेव्हा पासुन भाजप महायुतीची सरकार स्थापन झाली तेव्हा पासून गडचिरोली जिल्ह्याचा विकास होत आहे. जिल्ह्यातील भाजपा खासदार,आमदार यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणुन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देत आहेत.गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपा आमदार डॉ. देवरावजी होळी हे सर्व समाज बांधवांच्या विकासासाठी सर्व समाज बांधवांचे मेळावा घेवुन त्यांचे समाजाचे एकत्रिकरण व त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्या समस्यांचे निवारण करीत आहेत.व सर्व समाज बांधवांच्या विकासासाठी नेहमी झटत आहेत.याकरिता सर्व समाज बांधवांनी भाजपा माहायुती सरकारला मतदान करून सत्तेत आणावे.असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.
भाजपा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात नवेगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करतांना सौ.योगीताताई पिपरे बोलत होत्या.
यावेळी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी,पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी इचोडकर,उपसभापती विलासभाऊ दशमुखे, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी,नवेगावच्या सरपंचा,उपसरपंच राजुभाऊ खंगार,वैद्यकीय सेलचे डॉ. अविनाशजी शंखरदरबार व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments