संपूर्ण जिल्ह्यामधे घर घर चाललो अभियान राबवा..
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे आवाहन
गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची व केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता घर-घर चलो अभियानाला सुरुवात केलेली आहे. याच धरतीवर भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये घरघर चलो अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी दिली.
प्रशांतजी वाघरे समोर बोलताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून भाजपाच्या वतीने घर घर चलो अभियानांतर्गत घरा-घरा मध्ये जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे पत्रक जनतेपर्यंत पोहोचवा असे आव्हान जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना केले.
शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार..
आपल्या महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दर महिन्याला ला महिलांच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व या योजनेचा लाभ थेट महिलांना वेळेवर भेटत आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला व या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, पीएम किसान निधी व नमो किसान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कृषीपंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे , शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे, महिलांकरिता बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यांना आधार देण्याच्या ठरल्या असून या योजनांची माहिती घर-घर चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा तसेच योजनांचा लाभ जनतेला घेता येईल त्यासाठी त्यांना सहकार्य करा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
0 Comments