सावंगी गावातील पूर परीस्थितीची आमदार कृष्णा गजबेंकडून पाहणी.
सावंगी येथील ग्रामस्थांशी साधला संवाद.
देसाईगंज:- दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे, नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागले आहेत. अशातच गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच येवा वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून नद्यांना पाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे नदी लगत असलेल्या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका पत्करावा लागू नये; याकरीता गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी; तसेच पूर आलेल्या नदी तीरावर मासे पकडण्यासाठी, जनावरे व वाहन धुण्यासाठी जाऊ नये म्हणून आज, गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज तालुक्याच्या सावंगी गावात भेट देत वैनगंगा नदीला आलेल्या पूर परीस्थितीची पाहणी करीत ग्रामस्थांशी संवाद साधला.
*ग्रामस्थांशी संवाद साधतांना आमदार गजबे यांनी सांगितले की, सध्या स्थितीत गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सदरची पाणी पातळी नियंत्रित आणण्याकरिता आज दुपारच्या सुमारास गोसीखुर्द धरणाचे १९ दरवाजे २.५० मीटरने तर १४ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले असल्याने पाण्याचा विसर्ग वाढून नदी काठावरील गावकऱ्यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पुरामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहेत; अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणार असून लवकरात-लवकर नुकसाभरपाईची रक्कम देण्यात येईल; असे आमदार गजबे यांनी प्रसंगी म्हटले आहे.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, सरपंच प्रभाताई ढोरे, उपसरपंच सुमंतजी मेश्राम, भाजपा शक्ती केंद्र प्रमूख श्यामरावजी अलोने, त.मु. अध्यक्ष अशपाकभाई सय्यद, ग्राम पं. सदस्य राजुभाऊ कुरेशी, सदस्य देवानंद बनसोड, नरेशजी डोंगरे, भिवाजी पेलणे, तलाठी बंनकरजी, कृषी सहाय्यक तीचकुलेजी व गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments