धानोरा पोलीसांनी केले अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त



धानोरा पोलीसांनी केले अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन जप्त

 02 पिकअप वाहन व 14 गोवंशीय जनावरांसह एकुण 9,15,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.



गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिनांक 26/08/2024 रोजी दोन पिकअप वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन गोडलवाही वरुन गडचिरोली मार्गे घेऊन जाणार आहे. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस पथकाने गोडलवाही फाटा धानोरा मार्गावर सापळा रचुन पाळत ठेवली असता, दोन पिकअप वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आले. त्यावेळेस सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. वाहन क्रमांक एमएच 34 बी.जी. 5152 महिंद्रा इंम्पेरीओ पिक अप ज्याचा चालक नामे प्रतिक डंबाजी बांबोळे रा. उसेगाव ता. सावली जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनात 02 बैल तसेच 05 गायी त्याचप्रमाणे वाहन क्रमांक एमएच 34 बी. झेड. 4904 ज्याचा चालक नामे भुवन नामदेव सोनुले वय 37 वर्षे रा. सावली ता. सावली जि. चंद्रपुर याचे ताब्यातील वाहनात 04 बैल व 03 गायी असे एकुण दोन्ही चारचाकी वाहनात 14 जनावरे ज्यांची किंमत 1,15,000/- रुपये किंमतीचे जनावरे व दोन पिकअप वाहन अंदाजे किंमत प्रत्येकी 4,00,000/- रुपये प्रमाणे एकुण 8,00,000/- असा एकुण 9,15,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे 1) प्रतिक डंबाजी बांबोळे रा. उसेगाव ता. सावली जि. चंद्रपुर 2) भुवन नामदेव सोनुले वय 37 वर्षे रा. सावली ता. सावली जि. चंद्रपुर तसेच पाहिजे आरोपी नामे 3) गोलु फाले रा. पारडी ता. सावली जि. चंद्रपुर यांच्यावर पोलीस स्टेशन, धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प कारवाफा अतिरीक्त कार्यभार उपविभाग धानोरा श्री. जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे, धानोरा पोनि. स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात मपोउपनि. चैत्राली भिसे, पोउपनि. सुमित चेवले, सफौ/टेंभुर्णे, पोहवा/गावडे, रविंद्र मडावी, पोना/बोरकुटे, मानकर, पोशि/ चंद्रशेखर मैंद, शशिकांत मडावी यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments