कॅन्सरग्रस्त महिलेस तनुश्री आत्राम कडून आर्थिक मदत
गडचिरोली,
आपद्ग्रस्तांना नेहमी मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज शहरातील कॅन्सरने पीडित एका महिलेला आर्थिक मदत केली.
गोकुळनगर येथील पिंकी राजू भांडेकर ह्या कॅन्सरने आजारी असल्याची माहिती मिळताच तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांची भेट घेऊन धीर दिला. शिवाय उपचारासाठी आर्थिक मदतही केली
0 Comments