गडचिरोलीची तरुणाई चांगलाच धडा शिकविणार. रोजगाराची आशा दाखवून फसवणूक करता.- महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप


गडचिरोलीची तरुणाई चांगलाच धडा शिकविणार..
महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप



लोहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमातून खासदारांना वगळले

गडचिरोली

लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पराभवाची चिन्हे दिसू लागल्याने भाजप व मित्रपक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या वाफरू लागले आहेत.मागील निवडणुकीत सुरजागडच्या माध्यमातून गडचिरोली च्या तरुणांना रोजगाराचे देण्यात आलेले आश्वासन पुरते फोल ठरले
आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी तालुक्यातील आदिवासी तरुणांना रोजगार देण्याच्या भुलथापा सत्ताधारी व कंपनी प्रशासन देत आहे.यांची ही नौटंकी जिल्ह्यातील तरुणांना चांगलीच लक्षात आली आहे.रोजगाराची आशा दाखवून गडचिरोलीच्या तरुणांची फसवणूक करता ते तुम्हाला माफ तर करणार नाही. पण चांगला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आहेत अशात उद्या अहेरी येथील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने लोहखनिजावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री धर्मराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे यांनी ही टीका केली आहे.
न विसरू शकणारी फसवणूक...
सुरजागड लोहप्रकल्पाचे जेव्हा उदघाटन झाले तेव्हा मोठमोठे आश्वासन देण्यात आले. गडचिरोली च्या 40 तरुणांना ट्रॅक देण्याबाबत सांगण्यात आले. भव्यदिव्य कार्यक्रमात त्यांना ट्रॅक च्या सिम्बाल रुपी चाब्या देण्यात आल्या. यासाठी त्यांना एक लाख रुपये बँकेत ठेवायला सांगितल्या गेले. या तरुणांना केवळ चाब्या दिल्या. ट्रॅक साठी ही मंडळी महिनोमहीने हेलपाटे मारत होती. तरुणांना आश्वासन देण्याचा हा प्रकार मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेवर करण्यात आला होता. आताही विधानसभा निवडणूक लक्षात घेता पुन्हा तरुणांचा खोटी आश्वासन देण्याचा प्रकार करण्यात येत आहे. असे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधीना वगळता..
हा अपमान सहन केल्या जाणार नाही.
उद्या 17 जुलै रोजी अहेरी तालुक्यात सुरजागड इस्पात कंपनीच्या लोहखनिज प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी पत्रिका छापन्यात आल्या. यात मात्र गडचिरोली चे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे नाव वगळन्यात आले. हा मुद्दा घेत जिल्हा काँग्रेस कमिटी ने आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे. हा गडचिरोली जिल्यातील 16 लाख लोकांचा अपमान असल्याचे काँग्रेस चे म्हणणे आहे. सदर कंपनी ही भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना फायदा करून देण्याच्या हेतूने काम करीत आहे असे सांगत
जनतेच्या प्रतिनिधिंचा अपमान करणाऱ्या कंपनीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
गडचिरोलीतील तरुणाई धडा शिकविणार....
लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत जनतेने काँग्रेस ला कौल दिला. भाजपच्या फुसक्या, पोकळ आश्वासनाला त्यांनी दणका दिला. प्रकल्पाच्या नावावर तरुणांना रोजगाराचे दिव्यस्वप्न दाखवायचे अनं वेळेवर हात दाखवायचे हे धोरण आदिवासी व इतर तरुणांशी खेळ करणारा आहे. आता विधानसभा निवडणुका येत आहेत. आताही ते हाच फॉर्मुला राबवित आहेत. पण गडचिरोलीतील तरुणाई यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments