सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प
युनियन बजेट
- महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी
गडचिरोली,
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करनारा अर्थसंकल आहे. वाढलेली महागाई - बेरोजगारी या मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून, नव्याने स्थापन झालेल्या सरकाकडून सर्वसामान्य नागरिकांना, तरुणांना आणि महिलांना मोठी अपेक्षा होती, मोदी सरकारने सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग आणि प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम केले, येथील तरुणाचा रोजगार हिसकावीला, मात्र रोजगार निर्मिती च्या अनुषंगाने कुठला एखादी नवा प्रकल्प महाराष्ट्राला दिला नाही, स्टायफंड च्या माध्यमातून फक्त युवकांना खोटे आमिष दाखवीण्यात आले आहे. विविध योजनाच्या माध्यमातून फक्त फुगीर आकडे सरकारणे दिले आहेत, मात्र प्रत्यक्षात त्या योजनाचा लाभ किती लोकांना मिळतो हा सुद्धा संशोधनाचा मुद्दा आहे.
0 Comments