गडचिरोली भाजपा महिला पदाधिकारी यांची मुंबई मंत्रालयाला भेट - आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिली मंत्रालय परिसराची माहिती

गडचिरोली भाजपा महिला पदाधिकारी यांची मुंबई मंत्रालयाला भेट

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिली मंत्रालय परिसराची माहिती

 
गडचिरोली,
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपा महिला पदाधिकारी मुंबई येथे आले असता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांना मंत्रालय परिसरात प्रवेश करून देत परिसराची माहिती दिली. यावेळी त्यांनी मंत्रालयात उपस्थित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट घडवून दिली. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. बिनाराणी देवरावजी होळी, भाजपा जिल्हा महामंत्री सौ. योगिताताई प्रमोद पिपरे, जिल्हा पदाधिकारी अनिता रॉय, माजी नगरसेविका निताताई उंदिरवाडे, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, माधुरीताई पेशट्टीवार, सौ. मंदाताई मांडवगडे, स्मृतीलता ढाली, आलो बोष, पुष्पा कडकाडे, ज्योती बागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments