आजारी महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत!

आजारी महिलेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत!


भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जोनावाही येथील रहिवासी ( आजारी महिला )कविता भास्कर मडावी हिला काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांना दवाखान्यात भर्ती करण्यासाठी त्या मडावी परिवाराला आर्थिक अडचण भासत होते.
आज मन्नेराजाराम ग्रामपंचायतचे सदस्य सूरज तलांडे यांनी मुख्यालय येथील काही कामानिमित्त आल्याने दरम्यान काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील कंकडालवार यांची भेट घेऊन त्या आजारी महिलांची अडचण सांगितले होते.अजय कंकडालवार यांनी त्या आजारी महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तसेच औषध उपचारसाठी सूरज तलांडे यांच्या मार्फतीने आर्थिक मदत पाठवण्यात आली.या आर्थिक मदतीविषयी मन्नेराजाराम येथील मडावी कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम ग्रामपंचायत सदस्य सुरज तलांडी,ग्रामपंचायत सदस्य बाबुराव तलांडी,नरेंद्र गर्गम,योगिता कोरेत,प्रभाकर मडावी,दिनेश जुमडे चिनू सडमेक,नागापुरे काका,राकेश सडमेक,राकेश अलुरवारसह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments