मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांना रेखाताई धकाते परिवाराकडून ब्लॅंकेट व बॅटरीचे वाटप

मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांना रेखाताई धकाते परिवाराकडून ब्लॅंकेट व बॅटरीचे वाटप

स्वर्गीय शांताराम धकाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमर गीता फाउंडेशनचा उपक्रम


  गडचिरोली :- 

     अमर गीता फाउंडेशन गडचिरोलीच्या वतीने स्वर्गीय शांताराम धकाते यांचे स्मृतीप्रीत्यर्थ श्रीमती रेखाताई धकाते व त्यांच्या परिवारा कडून  गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिक व महिलांना पावसाळ्यात व हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंडीपासून बचाव करता यावा व अंधारामध्ये त्यांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून ब्लॅंकेट व बॅटरी तसेच खाऊचे वाटप  करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे व गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते तसेच धकाते परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री वृद्धाश्रम येथील नागरिक व महिलांना ब्लॅंकेट व बॅटरीचे वाटप करण्यात आले.
     यावेळी अमर गीता फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक बैस, धकाते परिवारातील सदस्य रेखाताई धकाते, संदीप धकाते, प्रदीप धकाते, रविना धकाते, वर्षाताई धकाते, श्रावणी धकाते, स्वराज धकाते, नीताताई बैस, लक्ष्मी बच्चलवार, धनश्री शिवणकर, विधी बैस, लक्षिता बैस, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गंगाधर चंदावार तसेच सेवाकर्ती विमलबाई रोहणकर उपस्थित होते.
   स्वर्गीय शांताराम धकाते स्मृती प्रीत्यर्थ रेखाताई धकाते व त्यांच्या परिवाराच्या वतीने ब्लॅंकेटचे तर लक्ष्मी बच्चलवार यांच्या कडून बॅटरी तर धनश्री शिवणकर यांच्याकडून बिस्किटे व खाऊचे वाटप वृद्ध नागरिकांना करण्यात आले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिक व महिला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments