समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृहाची यादी तात्काळ जाहीर करा - अनुप कोहळे यांची मागणी

समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृहाची यादी तात्काळ जाहीर करा - अनुप कोहळे यांची मागणी


गडचिरोली:: 
शाळा महाविद्यालय सुरु होऊन जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ झाला मात्र समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहांची काही वर्गाच्या यादी अद्यापही जाहीर न झाल्याने वस्तीगृहाकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थी वस्तीगृहाचा पर्याय निवडतात  मात्र आता महाविद्यालय सुरु होऊन बराच काळ लोटल्याने अद्यापही वसतिगृह सुरु झाले नाही त्यामुळे मुलांना बाहेर रूम करून रहावा किंवा अपडाऊन करावा लागत आहे त्याचा आर्थिक व मानसिक त्रास विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाकी असलेल्या वर्गाच्या याद्या जाहीर करून तात्काळ वसतिगृहात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी समाज कल्याण आयुक्त गडचिरोली यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Post a Comment

0 Comments