राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोलीत मौन निषेध - जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे नेतृत्वात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोलीत मौन निषेध


गडचिरोली,
इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे नेतृत्वात मौन निषेध महात्मा गांधी यांचे प्रतिमेसमोर पाळण्यात आला. मणिपूर मध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुःखद घटना असून याचे पडसाद देशात सर्वत्र उमटत आहेत. राज्यात दोन समाजामध्ये वाढलेला तणाव लक्षात घेऊन, मणिपूर राज्य सरकार तर्फे यापूर्वीच योग्य उपाय योजनांचा व कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले. मणिपूर मध्ये गेल्या काही महिन्यांपासून संवेदनशील परिस्थिती असतांना देखील, केंद्र व मणिपूर राज्य सरकारने अद्याप पर्यंत मौन बाळगलेले आहे त्यानंतर विविध समाज माध्यमांनी मणिपूर मधील महिला वरील अत्याचाराचा हा मुद्दा उचलण्यावर देखील केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही, हे विशेष शेवटी सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारला खडे बोल सुनवावे लागले. आज देशामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून, कुणालाही कायद्याची भीती राहिलेली नाही हे वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरून स्पष्ट होत चालले आहे त्यामुळे देशातील सर्व महिला वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येत नाही अशावेळी केंद्र सरकारतर्फे कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा अन्याया व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर बसून व काळ्याफिती लावून निषेध पाळण्यात आला, यावेळी एड.संजय ठाकरे प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजय गोरडवार शहराध्यक्ष गडचिरोली, संजय कोचे जिल्हाचिटणीस, नईम शेख, अशोक माडावार, अमर खंडारे सेवादल जिल्हाध्यक्ष, इंद्रपाल गेडाम जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, प्रमिला रामटेके महिला जिल्हाध्यक्षा सामाजिक न्याय विभाग, संध्या उईके माजी नगरसेविका गडचिरोली. मिनल चिमुरकर माजी नगरसेविका गडचिरोली, प्रसाद पवार जिल्हाउपाध्यक्ष रायुकाँ, अमोल कुळमेथे युवक शहरअध्यक्ष गडचिरोली. अशोक कत्रोजवार तालुका सेवादल अध्यक्ष, मल्लया कालवा शहर अध्यक्ष सेवादल, आरती कोल्हे निरीक्षक महिला राकाँपा चामोर्शी, उमा बनसोड, सुवर्णा पवार महीला जिल्हा उपाध्यक्षा, रमेश बनसोड, नागोराव उईके, सुनिल चिमुरकर, सुरेश जोंधळे, अतुल नैताम, विजय जाधव, शाहरुख पठाण, रेखा कोराम महीला जिल्हा चिटणीस, विवेक चंदनखेडे, सुभाष धाईत, आशा मेश्राम, सुनिता सेलोकर, वंदना चंद्रगिरेवार, जयनब शेख, गणेश मेश्राम, जिब्राईल शेख, राहुल कोसरे, हरीश कुमरे , राकेश गुरूनुले, यांचेसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments