आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा गरीब मुलांना शाळा शिकू द्या!


आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा 
गरीब मुलांना शाळा शिकू द्या!

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली निवेदन
 आंदोलन


गडचिरोली,
मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने गडचिरोली जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विवेक पी नाकाडे  कार्यालयासमोर निदर्शने केली.व निवेदन देण्यात आले
'एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात , परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब , वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे' अशी टिका आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी केली.
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून *गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे असा आरोप यावेळेस केला.
फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होते आहे असे प्रतिपादन आप चे गडचिरोली जिल्हा..अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे.. यांनी केले.

शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला. आज च्या निवेदन, निदर्शनात..जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे ,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी खरवडे,महिला युवा अध्यक्ष सोनल ननावरे,शेतकरी आघाडी अध्यक्ष डॉ देवेंद्र मुंघाटे ,महिला संघटनमंत्री दिपीका गोवर्धन, प्रवक्ता अल्का गजबे,सदस्य दिवाकर साखरे,डॉ सुरेश गेडाम उद्यानी गोवर्धन आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments