भाजप सरकारचे लोकाभिमुख कार्य सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचवा- प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे

भाजप सरकारचे लोकाभिमुख कार्य सर्वसामान्य जनतेपर्यन्त पोहचवा- प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे
   
 महिला आघाडीच्या तालुका बैठकित विविध विषयांवर चर्चा

गडचिरोली :
     भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार अनेक उपक्रम व योजना राबवीत असून या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळत आहे. आपल्या गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना व महिलांना शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी करावा व भाजप सरकारचे कार्य सर्वसामान्य नागरिक व महिलांपर्यन्त पोहोचवण्याचे कार्य महिलांनी करून भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी मजबूत करण्यावर भर द्यावा व आगामी निवडणुका लक्षात घेता आतापासूनच तयारीला लागून नागरिकांचे प्रश्न व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली  जिल्ह्याच्या प्रभारी  वनिताताई कानडे यांनी केले. महिला आघाडी च्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

    भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी तालुका महिला आघाडी ची महत्वपुर्ण बैठक  नुकतीच पार पडली. या बैठकीला भाजप महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी , महिला आघाडीच्या  गडचिरोली शहर अध्यक्षा कविता उरकुडे, भाजपच्या अहेरी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्ली, अहेरी नगर पंचायतीच्या नगरसेविका शालिनी पोहनेकर, नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मालूताई तोडसाम, माजी तालुका अध्यक्ष किरण भांदककार, अरुणा गेडाम, अनिता मडावी, ममता उईके, गडचिरोली शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव पूनम हेमके व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments