राष्ट्रवादी काँग्रेस महिला जनजागर यात्रेची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस महिला जनजागर  यात्रेची आढावा बैठक संपन्न



गडचिरोली,
   राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य वतीने २४ जानेवारी रोजी राकाँचे शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे हॉटेल सेंट्रल पार्क  डेक्कन येथे  महिला जनजागर यात्रेची सुरुवात करण्यात होती 
    ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जनजागर यात्रा केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या महागाई व बेरोजगारीच्या विरोधात  ही महिला जनजागर यात्रा  काढण्यात येणार आहे
    ही महिला जनजागर यात्रा फरवरी च्या दुसऱ्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात दाखल होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात  जनजागर महिला यात्रा उत्तमरीत्या यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस  विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष  शाहीन हकीम यांच्या अध्यक्षतेखाली २४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय गडचिरोली  येथे   महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली
    केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले असून महागाई चा मार सतत त्रास देत आहे.शिवाय बेरोजगार तरुण व तरुणींची संख्या लाखो च्या घरात वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकार विरोधात आवाज उठविणे अत्यन्त गरजेचे आहे त्यामुळे सर्व महिलांनी मिळून महिला जनजागर यात्रा यशस्वी करावी असे प्रतिपादन शाहीन हकीम यांनी आढावा बैठकीत केले.
   सदर बैठकीला राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, महिला विभागीय सचिव सोनाली पुण्यपवार,रा.काँ.जिल्हा सचिव संजय कोचे,जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके,सेवादल जिल्हा अध्यक्ष अमर खंडारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, युवक शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, महिला शहर अध्यक्ष मिनलताई चिमुरकर, महिला तालुका अध्यक्ष निताताई बोबाटे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा पवार,नंदा तिम्मा महिला तालुका अध्यक्ष चामोर्शी, बेबीताई लभाने,,आशाताई मेश्राम, मोहम्मद मुताहिर ,नफि खाँन तसेच अन्य  जिल्हा महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments