गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्येवर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेशजी टिकैत शी चर्चा.

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्येवर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेशजी टिकैत शी चर्चा.
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध समस्येवर गडचिरोली जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यांनी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेशजी टिकैत सोबत चर्चा केली.
राकेशजी टिकैत सध्या देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते म्हणून पुढे आले आहेत.त्याच्या व अ.भा.किसना सभेच्या नेत्रुत्वात दिल्ली येथे तीन काळे कायदे मागे घेण्यासाठी 380 दिवस आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात 700 पेक्षा जास्त शेतकरी शहिद झाले. शेवटी मोदी सरकारला तिन काळे कायदे मागे घ्यावे लागले.
देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रत होत असल्याने संयुक्त किसान मोर्चा चे राष्ट्रीय नेते 17/18/19 सप्टेंबर ला विदर्भ दौऱ्यावर आले होते. व वर्धा, अमरावती व अकोला येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुबाला भेटी दिले. व शेतकरी हक्क परिषद घेण्यात आले होते.
या परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील अ.भा. किसान सभेचे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार सहभागी झाले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध विषयांवर शेतकरी  नेते राकेशजी टिकैत, डॉ.अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्याशी चर्चा केली. 
वडसा तालुक्यातील कुरुड,कोंढाळा  चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा, जैतापुर येथील शेतकर्यांचे जमीन संपादनाचा विषय, जिल्ह्यातील लोहखानी च्या नावे होत असलेली लुट या विषयावर चर्चा केली.
व गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या शेतकर्याच्या आंदोलन व आदिवासी समुदायाचे जंल, जंगल, जमीन च्या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली.
व गडचिरोली जिल्ह्यात दौरा करावे अशी विनंती केली. या परिषदेत  मधुकर कोवासे, ब्रम्हदास बावणे, हरिश कुमरे, विठ्ठल प्रधान, किसन राऊत, यशवंत नारनवरे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments