शहिद भगतसिंगांच्या वैचारिक सिद्धांतावर युवकांनी कार्य करावे -
माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे प्रतिपादन
आरमोरी ,
२८ सप्टेंबर २०२५: अल्पायुष्य लाभलेला भारतीय थोर तत्वज्ञानी, कृतीशील व्यक्तिमत्त्व शहिद भगतसिंग यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक बदलांसोबतच राष्ट्रीय राजकारणात अत्यंत धाडसी प्रवृत्तीने विविध कार्य केले.ते प्रेरणादायी कार्य त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरणे हेच विनम्र अभिवादन ठरेल.भगतसिंगांनी हयातभर जोपासलेल्या सिध्दांतरुपी कार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी व आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले.
ते आरमोरी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २८ सप्टेंबरला आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
सर्वप्रथमत: उपस्थित मान्यवरांनी शहिद भगतसिंगांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार,मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष रणजित बनकर,मनोज पांचलवार, पत्रकार हरेंद्र मडावी,रूबी सहारे, अतुल नैताम,पियुष चिलांगे,
महिला नेत्या अर्चना मारकवार, मिलिंद रामटेके,महेश दहिकार आदी उपस्थित होते.
यावेळी अमोल मारकवार यांनी भगतसिंग यांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला.तसेच उपस्थित मान्यवरांनी 'शहिद भगतसिंग अमर रहे',अमर रहे अशा घोषणा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ पत्रकार चुन्नीलाल मोटघरे यांनी केले.तर आभार विलास गोंदोळे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी व्यापारी व सर्व मित्रमंडळी आदींनी सहकार्य केले.
------------------------------------
0 Comments