जीएसटी दर घटले - ग्राहक व उद्योग दोघानाही फायदा होणार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती


जीएसटी दर घटले - ग्राहक व उद्योग दोघानाही फायदा होणार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती
गडचिरोली ,ता. २१ : भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार असून, त्यातून ग्रामीण, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे, असे मत भाजपाचे गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशातील गरिबी दूर होऊन, रोजगारनिर्मिती वाढून आणि भ्रष्टाचाराला आळा बसून आर्थिक शिस्त प्रस्थापित होणार आहे. पूर्वीच्या सरकारांनी केलेल्या अनियमिततेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक सुधारणा राबवत देशाला नव्या विकासाच्या मार्गावर नेले आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. चार वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांचा थेट फायदा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना झाला आहे.२०१४ नंतर भारताची जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावली असून, भ्रष्टाचारमुक्त व स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा विश्वासार्ह प्रयत्न झाल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.राज्य सरकारच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग व व्यापारवाढीस चालना मिळत असून, गडचिरोली जिल्ह्यातही विकासकामांना गती मिळणार आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत आ. मिलिंद नरोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉ.नितीन कोरवते,जिल्हा महामंत्री गिता ताई हिंगे ,महिला जिल्हाध्यक्ष योगिता ताई पिपरे , रमेश भुरसे, अनिल पोहणकर ,अनिल कुणघाडकर, सुधाकर येंगंधलवार,शहर अध्यक्ष सिमा कन्नमवार, अविनाश विश्रोवार,विवेक नवघडे, नरेश हजारे, रमेश नैताम, देवाजी लाटकर, डॉ. प्रिया खोब्रागडे, अर्चना चन्नावार,वर्षा शेडमाके उपस्थित होते

Post a Comment

0 Comments