शेकडो नागरिकांनी घेतला मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ गण्यारपवार फांउडेशन व डॉ. महात्मे आय हॉस्पीटलचा उपक्रम
गडचिरोली :- गण्यारपवार फाऊंडेशन चामोर्शी
तथा महात्मे आय हॉस्पिटल नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवारला आशीर्वाद सभागृह गोकुळनगर येथे मोफत
नेत्रतपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. सर्व प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गडचिरोलीचे अध्यक्ष विजय गोरडवार यांचे हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभघेतला
यावेळी राष्ट्रवादी शप चे प्रदेश चिटणीस एड. संजय ठाकरे , जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, गण्यारपवार फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अमोल गण्यारपवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव शिवणकर, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर निमजे, जिल्हा उपाध्यक्षा विमल भोयर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, युवक शहर अध्यक्ष विवेक कांबळे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षा नीता बोबाटे, करिश्मा चौधरी, आदी उपस्थित होते.
त्या नंतर शिबीराला सुरुवात करण्यात आली. यावेळी २५० लोकांना मोफत तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तर जवळ जवळ १०० हून अधिक रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे. सुमारे ५०० हून अधिक लोकांनी शिबिरात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोन पठाण बेबी लभागो मल्लया कालवा
यशस्वीतेसाठी मोनु पठाण, बेबी लभाणे, मल्लया कालवा, नीलेश कोटगले, राजू डांगेवार, यांचे सह अनेकांनी सहकार्य केले.
अतुल गण्यारपवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष गडचिरोली. यांचा नुकताच वाढदिवस पार पडला याच औचित्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरात करण्यात आले होते, जसे की, मतिमंद मुलांसाठी शालेय गणवेश वितरण, महिलांना ब्लँकेट वाटप, रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान, वृक्षारोपण, या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
0 Comments