गडचिरोलीचा गौरव! डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची ‘पॅरामाउंट्स अचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मानाची निवड
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते विशेष सन्मान व अभिनंदन
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र, निष्ठावान समाजसेवक आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड ‘पॅरामाउंट्स अचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय संस्थेत झाली आहे.
ही निवड म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक, नैतिक व प्रेरणादायी उंचीचीही दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाची लहर पसरली असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जागतिक पातळीवर मान्यता
‘पॅरामाउंट्स अचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ही संस्था समाजात असामान्य, प्रेरणादायी आणि कल्याणकारी कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचे योगदान जगापुढे मांडते. या मान्यतेसाठी निवड होणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या कार्याची विशिष्ट ओळख आणि जागतिक स्वीकार होय.
समाजहितासाठी समर्पित कार्य
डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोलीसारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त व दुर्गम भागात गेली अनेक वर्षे सातत्याने आणि समर्पितपणे समाजसेवा केली आहे. ते दुर्गम गावांमध्ये जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेतात, शासन दरबारी मुद्दे प्रभावीपणे मांडतात.मानवाधिकार, आरोग्य, शिक्षण, न्याय आणि मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने लोकजागृती, सहाय्य आणि नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून विशेष गौरव
या अभिमानास्पद प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात डॉ. खुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या वेळी मा.खा. डॉ. नेते म्हणाले डॉ. प्रणय खुणे यांचे हे यश गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजसेवेसाठी समर्पितपणे झटणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालेला हा सन्मान जिल्ह्यातील युवकांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे.
त्यांचा संघर्ष, चिकाटी व कार्यपद्धती ही आजच्या तरुण पिढीला दिशा देणारी आहे."असे मत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले. माझी झालेली निवड व मला दिलेली मान्यता जनतेच्या विश्वासाची आहे!
डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची नम्र प्रतिक्रिया..
या सन्मानाच्या निमित्ताने आपली प्रतिक्रिया देताना डॉ. खुणे म्हणाले: "हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही. हा सन्मान म्हणजे जनतेच्या आशीर्वादाची, त्यांच्या विश्वासाची आणि त्यांच्या सहभागाची फलश्रुती आहे." "जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा मानून आजवर मी कार्य केले. आणि यापुढेही कोणतंही पद पुरस्कार किंवा मान-अपमान न पाहता, मी समाजासाठी कार्य करत राहीन.
ते पुढे म्हणाले: "हा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक गावाचा आहे. मला साथ देणाऱ्या प्रत्येक हातामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
सेवा करताना आलेले अनेक संघर्ष, धोके व आव्हान यांची आठवण करत ते म्हणाले: "सेवा करताना मिळणारे समाधान हेच खरे यश आहे. आणि जर माझं यश कुणा एका युवकालाही समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देत असेल, तर माझं योगदान सार्थक झालं असं मी मानीन."
डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची ही निवड म्हणजे एक प्रेरणा, एक दिशा, आणि एक समर्पणाची कथा आहे. त्यांच्या नम्रतेतून त्यांच्या मनातील समाजप्रेम, कार्यातील पारदर्शकता आणि बांधिलकी प्रकट होते "सन्मान ही क्षणिक बाब आहे, पण सेवा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,"
हाच त्यांचा जीवनविचार, हाच त्यांचा वसा! नेहमी साठी राहीलच.
यावेळी डॉ. प्रणयजी खुणे यांचे अभिनंदन करतांना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी, तारेंद्र भाऊ बोरडे,आसुटकर भाऊ,राहुल भाऊ व मित्र परिवार उपस्थिती होते.
0 Comments