राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम सपन्न

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे
वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम सपन्न



भामरागड:- राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम सपन्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम व सरस्वती मातेच्या व विश्वेश्वरराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चालुरकर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद घोनमोडे सर, डॉ. संतोष डाखरे सर, डॉ. कैलास व्हि. निखाडे, तसेच डॉ. सुरेश डोहणे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तविक ग्रंथपाल श्री. प्रा. विनायक मोराळे सरांनी डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाष टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चालुरकर सरांनी अध्यक्षीय भाषणात स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद घोनमोडे सरांनी आपल्या भाषणातून शिक्षण विषयक विचार मांडले. प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे सरांनी आपल्या मार्गदर्षनांतून सांगितले कि स्वप्न ती नसतात जी आपन झोपेत बघतो. स्वप्न ती असतात जी आपलेला झोपूच देत नसतात. डॉ. सतोष डाखरे सरांनी सांगितले की डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलामांचे जीवन आणि त्यांचे विचार आत्मसात करावेत. असे सांगितले. डॉ. सुरेश डोहणे सरांनी विद्यार्थ्यांना नेहमी काहीना काही तरी वाचले पाहिजे असे सांगितले. त्यांच बरोबर महाविद्यालयांत ग्रंथ प्रदर्शन भरविन्यात आले आहे. तसेच बी. ए. च्या विद्यार्थ्यीनी कु. पुष्पा होयामी व कु. ममता भांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. साक्षी भांडेकर तर आभार प्रदर्शन नागेश आलाम यांनी केले. कार्यक्रमासांठी महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच श्री. बंडू बोन्डे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमांची  सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments