धानाच्या हमी भावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जयश्रीताईंना आमदार करा
भेंडाळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाई मोहनराव गुंड यांचे आवाहन
चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धानाला सन्मानजनक हमी भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सक्षम आहे. त्यासाठी, एक महिला असूनही सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी स्वतःवर केसेस घेवून सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या जयश्रीताई जराते यांना शेतकऱ्यांनी एकत्र येवून आमदार करावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहनराव गुंड यांनी केले.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांच्या प्रचार - प्रसाराचे धोरण ठरविण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर - फराडा व भेंडाळा - मुरखळा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भेंडाळा येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबरला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, २०१९ साली धानाला केवळ १८०० रुपये हमीभाव होता. भाई रामदास जरातेंच्या नेतृत्वात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकाचवेळी १४ ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने चक्काजाम आंदोलन करुन सरकारला २२०० रुपये हमीभाव देण्यासाठी भाग पाडले. येणाऱ्या निवडणूकीत जयश्रीताईंना येथील शेतकऱ्यांनी आमदार म्हणून विधानसभेत पाठविले तर धानाला ३५०० हजार रुपये हमीभाव मिळवून दिल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही भाई मोहनराव गुंड यांनी यावेळी दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ते/ महामार्ग बाधित शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांच्या हस्ते या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून जयश्रीताई जराते, अध्यक्ष म्हणून शेकाप आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते उपस्थित होते. भाई शामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), डॉ. गुरुदास सेमस्कर (जिल्हा समिती सदस्य), भाई अक्षय कोसनकर (युवा नेते), कविता ठाकरे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी), गुड्डू हुलके (जिल्हाध्यक्ष युवक आघाडी), अभिलाषा मंडोगडे (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी), भाई पवित्र दास (जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी), भाई प्रभाकर गव्हारे (जिल्हाध्यक्ष महामार्ग बाधित शेतकरी आघाडी), भाई शर्मीश वासनिक (जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी) तर विशेष अतिथी म्हणून दामोधर रोहनकर, गंगाधर बोमनवार, प्रदिप आभारे, पांडूरंग गव्हारे,चंद्रकांत भोयर सौ. पोर्णिमाताई कांबळे, सौ. साधनाताई बानबले, सौ. पपीताताई सातपुते, डॉ. भाऊराव चौधरी, देवेंद्र भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते व जयश्रीताई जराते यांच्या प्रयत्नाने मौजा मोहुर्ली व सगणापूर येथील ८ ढिवर कुटूंबाना घरकुल मंजूर झाले. यावेळी त्या लाभार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते घरकुलांचे स्मृती चिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
कार्यकर्ता मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता
राजु केळझरकर (सगनापूर), मारोती आगरे (मोहुर्ली), देवराव शेंडे (मोहुर्ली), विजय राऊत (वेलतुर तुकूम), कालिदास पोरटे (वाघोली), भैय्याजी कुनघाडकर (भेंडाळा), प्रकाश पाल (फोकुर्डी), मंगेश येनप्रेड्डीवार (फराडा),सुभाष आकलवार (सगनापूर), खुशाल भगत (घारगाव), सगनापूर शाखा - गजानन देवाजी आभारे (चिटणीस), प्रभाकर पोरटे (खजीनदार), श्रावण भोयर (सहचिटणीस), प्रभाकर बोलीवार (सहचिटणीस), मोहुर्ली शाखा अनिल आगरे (चिटणीस), संजय भोयर (खजिनदार), रेवनाथ गेडकर (सहचिटणीस), कवरदेव मंडोगडे (सहचिटणीस), तुकूम शाखा रमेश यम्पलवार (चिटणीस), दिलीप आभारे (खजिनदार), गजानन तिवाडे (सहचिटणीस), रामदास कोहपरे (सहचिटणीस), वाघोली शाखा भोजराज गजानन भोयर (चिटणीस), रोशन मुरलीधर मोंगरकार (खजिनदार), ओमप्रकाश पोरटे (सहचिटणीस), रामचंद्र किरमे (सहचिटणीस), एकोडी शाखा प्रदिप पाल (चिटणीस), दिलीप चंदनखेडे (खजिनदार), विनोद निकुरे (सहचिटणीस), सतिश पाल (सहचिटणीस), भेंडाळा शाखा हेमंत कुंडेकर, सचिन सातपुते, किशोर सुरजागडे, दामाजी सातपुते, घारगाव शाखा अजय भगत, राजीव मंगर, छत्रपती दुरपळे, रमेश मंडोगडे (रामाळा), नितीन चलाख (खंडाळा), दयाकर येलेटीवार यांनी परिश्रम केले.
0 Comments