घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करा -ऋतुजा कन्नाके यांची मागणी

घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करा -ऋतुजा कन्नाके यांची मागणी


गडचिरोली,
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाचिटणीस ऋतुजा कन्नाके यांच्या नेतृत्वात नुकताच जिल्हाधिकारी संजय दैने यांना देण्यात आलेल्या निवेदनात गडचिरोली जिल्ह्याभरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शासनातर्फे घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत असून, मात्र तो लाभ अतिशय तुटपुंजा आहे. आत्ताच्या परिस्थितीत घर बांधकाम साहित्यात खूप मोठी दरवाढ झालेली असून, दिलेल्या अनुदानात बांधकाम करणे लाभार्थ्यांना अतिशय कठीण झाले आहे. त्यातल्या त्यात मजुरी सुद्धा वाढल्याने बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाने घरकुल योजनेत अंतर्गत दिल्या जाणारा लाभ हा महागाईनुसार ठरवून त्यात वाढ करण्यात यावी तसेच मागील वर्षीचे घरकुलाचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसून, लाभार्थी अडचणीत आले आहे. तरी देय्य असलेले अनुदानाची रक्कम तात्काळ देऊन तसेच बांधकामासाठी लागणारी वाळू सुद्धा वाढवून देण्यात यावी याबाबतचे निवेदन मा. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विमल भोयर, जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, गडचिरोली शहराध्यक्ष प्रीती कोवे, शहर उपाध्यक्ष नईमा हुसेन, शहर सरचिटणीस मीना मावळणकर,मंजुषा लांबट, सुनिता सेलोकर, खुशबू रामटेके, अश्विनी भसारकर, आदी महिला पदाधिकारी होते.

Post a Comment

0 Comments