पोलीस भरतीला येणाऱ्या उमेदवारांकरिता निवास व भोजनाची मोफत व्यवस्था - आमदार डॉ. देवराव होळी

पोलीस भरतीला येणाऱ्या उमेदवारांकरिता निवास व भोजनाची मोफत व्यवस्था - आमदार डॉ. देवराव होळी


गडचिरोली,
गडचिरोली जिल्हा केंद्रावर १९ जूनपासून पोलीस भरतीची मैदान चाचणी परीक्षा घेण्यात येत असून या मैदानी चाचणीला बाहेरून येणाऱ्या उमेदवारांकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी राहण्याची व सायंकाळी मोफत जेवणाची व्यवस्था उभी केली - आहे. आपल्या गडचिरोलीतील - चंद्रपूर रोडवरील पटेल मंगल - कार्यालयामध्ये २० जूनपासून ही व्यवस्था सुरू होणार आहे. तरी - गरीब गरजू उमेदवारांनी याचा लाभ - घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. - देवराव होळी यांनी केले आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांचा पुढाकार
आजपासून व्यवस्था सुरू होणार
पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या चाचणीच्या मैदान दिनांकासह नाव नोंदवून घ्यावे. तसेच उमेदवारांनी येताना कपडे, अंथरूण-पांघरूण, टावेल, ब्रश, साबून आदी दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य सोबत आणावे. हॉल तिकीटची झेरॉक्स, ओळखपत्र (आधारकार्ड)
झेरॉक्ससह आपले नाव नोंदवून घ्यावे. उमेदवारांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयीन सहकारी सूरज म्हस्के, भाजपा शहर उपाध्यक्ष राजू शेरकी, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष हर्षल गेडाम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments