महीला, शेतकरी, युवा, मागासवर्ग व सर्व समाजातील गरीबांना भरीव मदत करणारा अर्थसंकल्प - कृष्णा गजबे आमदार आरमोरी

महीला, शेतकरी, युवा, मागासवर्ग व सर्व समाजातील गरीबांना भरीव मदत करणारा अर्थसंकल्प


आरमोरी ,
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी राज्यातील महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग व सर्व समाजातील गरीबांना भरीव मदत करणारा वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला. महीलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन मोफत गॅस सिलेंडर , शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी सिंचन प्रकल्प, वन्यप्राण्यानी केलेल्या पिक नुकसान व मनुष्य हाणी साठी भरीव मदत, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा विज सवलत योजनेतून मोफत विज पुरवठा यासह युवकांना रोजगार, स्वयंरोजगार प्रशिक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने तुन प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देणे यासह मागासवर्ग व सर्व समाजातील गरीबांना भरीव मदत होईल अशा योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प वास्तववादी व सर्वांना प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे.


Post a Comment

0 Comments