देशामध्ये आपत्कालची घोषणा करून काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांचे काँग्रेसवर आरोप

देशामध्ये आपत्कालची घोषणा करून काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली
नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांचे काँग्रेसवर आरोप

भाजपा गडचिरोली वतीने 25 जून आणीबाणी दिवस काळा दिवस म्हणून साजरा..
गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने 25 जून आपत्काल दिन काळा दिवस म्हणून प्रेस क्लब धानोरा गडचिरोली येथे साजरा करण्यात. आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांतजी देशपांडे कार्यक्रमाचे उद्घाटक आ.डॉ. देवरावजी होळी व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे उपस्थित होते.
प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित श्रीकांत देशपांडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसवर टीका करत बोलले की, 
देशाच्या लोकशाहीची हत्या करण्याचा काम 1975 मध्ये इंदिरा गांधी व काँग्रेस सरकारने केले. देशामध्ये हुकूमशाही चालवण्याचा काम गांधी परिवार यांनी केला. खऱ्या अर्थाने संविधानाला धोका असेल तर काँग्रेस पासूनच आहे. असा आरोप श्रीकांत देशपांडे यांनी काँग्रेसवर केला. 
1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायबरी लोकसभा क्षेत्रामधून इंदिरा गांधी यांनी विरोधी उमेदवार राजनारायणजी यांचा पराभव केला. परंतु राजनारायणजी यांनी इंदिरा गांधी वर भ्रष्टाचार, काळाबाजार करून निवडणूक जिंकली असे आरोप करत निवडणुकीच्या निकाला विरोधात इलाहाबाद उच्च न्यायालय मध्ये याचिका दायर केली. राजनारायण यांनी दायर केलेल्या याचिका वर  सुनावणी करत 15 जून 1975 ला ईलाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी दायर केलेल्या याचिका वर सुनवाई करत राजनारायण यांना विजय घोषित केले व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पराभव घोषित करून त्यांची लोकसभा सदस्यता रद्द करून सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. 
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर केली.
 25 जून 1975 ला सुप्रीम कोर्ट मुख्य न्यायाधीश विआर कृष्णा अय्यर यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत इंदिरा गांधी यांना पदावर राहण्याची अनुमती दिली.परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये देशभर आंदोलन  पुकारण्यात आले. 
25 जून 1975 ला इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती भवन येथे तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांची भेट घेतली व राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या सूचनेवर 25 जून 1975 ला रात्री देशांमध्ये 21 महिन्यांकरिता आपत्कालची घोषणा केली.
देशामध्ये लावलेल्या आपत्कालच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारण्यात आले.या आंदोलनामध्ये सहभागी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी राजकीय नेत्यांना व 1 करोड 40 लाख लोकांना अटक करण्यात आले.
 लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडिया,वृत्तपत्राचा कायदा बदलवण्यात आला वृत्तपत्रांमध्ये सरकारच्या विरोधात काही बोलल्यास त्यांच्या पत्राला बंद करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली पत्रकारांवर कारवाई करत पत्रकारांना अटक केले. आपत्कालमध्ये देशातील जनतेचे संविधानिक अधिकार निलंबित करण्यात आले.
देशामध्ये आपत्कालची घोषणा करून  संविधानाच्या विरोधात जाऊन गांधी परिवाराने हुकूमशाही चालवली व देशाच्या लोकशाहीची हत्या केली. असे आरोप संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांनी काँग्रेसवर केले.

देशाच्या घटनेला आघात करून संविधानाचा अपमान काँग्रेसने केला..
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे आरोप

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी संबोधित करताना म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी राज्यघटना बनवली गेली भारताची दुर्गामी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बनवली गेली होती. मात्र या आधीच्या काँग्रेस सरकारनी मताच्या लालसेपोटी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी तिचा वापर केला त्यांच्या राज्यघटनेत अनेक वेळा उल्लंघन केले. 25 जून 1975 ला काळा दिवस आहे जेव्हा श्रीमती इंदिरा गांधींनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी देशाला हुकूमशाही कडे ढकलले व आपत्कालची घोषणा केली. देशाची लोकशाही चिरडून काढण्याचा काम केला. देशाच्या घटनेला आघात करून संविधानाचा आपमन करण्याचा काम काँग्रेसने केला. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याचा अपप्रचार करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला.
 जनतेने त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. व देशामध्ये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संविधानासमोर नतमस्तक होऊन संविधानाचा सन्मान केला. परंतु काँग्रेस ने सत्तेच्या लालसापोटी देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान केला असेल तर काँग्रेस सरकारने केला.असे आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी काँग्रेसवर केले.
यावेळी मंचावर श्रीकांत जी देशपांडे, आ.डॉ.देवरावजी होळी, जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेश भुरसे, प्रदेश सदस्य रवींद्र ओल्लारवार, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश बरसागडे, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर शहराध्यक्ष मुक्तेश्वर  काटवे. व कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments