शहरातील आठवडीबाजाराच्या स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष
रंजनीकांत मोटघरे, नदीम नाथानी यांचा आरोप
गडचिरोली:
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरते. या बाजारासाठी पंचक्रोशीतील नागरिक येत असतात. यासोबतच भाजीपाला विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर येत असतात. नागरिकांची व भाजीपाला विक्रेत्यांना सुविधा व्हावी म्हणून पालिकने दुकान गाळे बनविले आहे. मात्र, याच परिसरात असलेल्या घाणीचे साम्राज्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नदीम नाथानी व रजनीकांत मोटघरे यांनी केला आहे.
पावसाळ्याच्या दिवस असल्याने विविध साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती असते. याच कालावधीत आठवडी बाजार परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्यावतीने घंटा गाड्या फिरवून ओला व सूका कचरा गोळा केला जात आहे. असे असतानाही रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजार परिसरातील घनकचरा कोण उचलणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात सध्या विविध साथीच्या आजाराची लागण झाल्याची ओरड आहे. काही ठिकाणी मलेरिया, डेंग्यू तर काही ठिकाणी टायफाईडसारख्या आजाराची साथ सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. अशा परिस्थितीत आठवडी बाजारातील घनकचरा उचलण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आठवडी बाजारातील घनकचऱ्याचे त्वरीत व्यवस्थापन करावे, अन्थया काँग्रेसच्यावतीन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नदीम नाथानी, रजनीकांत मोघटरे, रूपेश टिकले यांनी दिला आहे.
0 Comments